आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचंड नुकसान:जळगाव निंबायतीत तासभर वादळी वाऱ्यासह पाऊस; खरिपाला फटका, नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जळगाव निंबायती महसूल मंडळांतर्गत शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी बाजरी व मक्याची उभी पिके भुईसपाट झाली आहेत. पिके जाेमात असतानाच नैसर्गिक संकट काेसळल्याने उत्पन्नात घट हाेवून शेतकऱ्यांना नुकसान साेसावे लागणार आहे. या परिसरात ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नाेंद झाली आहे.

गेल्या महिन्यात पाेहाणेसह २२ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला हाेता. ५ हजार ७९८ हेक्टरवरील बाजरी, मका, कापूस, साेयाबीन, भुईमूग, कांदा राेपे आदी पिकांचे नुकसान झाले हाेते. या नुकसानीचे नुकतेच पंचनामे करून अहवाल शासनाला सादर झाला असताना जळगाव निंबायती परिसर पावसाने झाेडपून काढला. सायंकाळच्या वेळी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. साेसाट्याचा वारा व टपाेऱ्या थेंबाच्या माऱ्याने बाजरी व मक्याची उभी पिके भुईसपाट झाली आहेत. झाडी, सावकारवाडी, मांजरे, एरंडगाव, जळगाव निंबायती, चाेंडी, शिरसाेंडी, साेनज व टाकळी या गावांना वादळी पावसाचा फटका बसला आहे. विद्युत तारा तुटल्याने बराच ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी
यंदा चांगला पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण हाेते. परंतु, वादळी वारा व पावसाने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. बाजरी व मका पिकांना माेठा फटका बसला आहे. महसूल व कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत भरपाई द्यावी.गाेकुळ निकम, शेतकरी, मांजरे.

उत्पन्नात घटीची शक्यता
तालुक्यातील ८२ हजार हेक्टर खरीप लागवडीपैकी तब्बल ४० हजार हेक्टरवर मका लागवड झाली आहे. बाजरीची १५ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. समाधानकारक पावसाने ही दाेन्ही पिके जाेमात हाेती. मात्र, वादळी पावसाने पिके आडवी पडून नुकसान साेसण्याची वेळ आली आहे. दाण्यांची परिपक्वता घटून याचा उत्पन्नावर परिणाम हाेईल. बाजरी काळी पडून नुकसान हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...