आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेतृत्वाची क्षमता ठेवणारा नेता आज भाजपच्या हातचे बाहुले बनला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर होत असल्याचे बघून वाईट वाटते. मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटविण्यासाठी ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम मुस्लिमांना नव्हे तर राज्य सरकारला दिला आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी गृह विभागाची आहे. मुस्लिमांनी भावनिक न होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शांतता राखावी, असे आवाहन करत एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली.
ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचे मुस्लिम बहूल मालेगाव शहरात टिकात्मक पडसाद उमटत आहेत. आमदार मुफ्ती म्हणाले, बाळासाहेब असताना राज हे त्यांचे उजवे हात मानले जात होते. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ते दिशाहिन झाले आहेत. विकासाचा मुद्दा नसल्याने जातीयवादी वक्तव्य करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ठाकरेंचा बाेलविता धनी कोण आहे हे जनता ओळखून आहे. देशात संविधान व कायदे आहेत. भोंगे फक्त मशिंदींवरच नाहीत. इतर सर्वधर्मियांच्या धार्मिकस्थळांवर भोंगे आहेत.
मात्र, हा मुद्दा मशिदींशी जोडून राजकारण सुरू आहे. भोंगे हटवायचे असतील तर सर्वच धार्मिकस्थळांवर कारवाई लागेल. सत्तेसाठी महाविकास आघाडी सरकार व भाजपचा राजकीय वाद सुरू असल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.