आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर रविवारी रंगपंचमीच्या सामन्यांमध्ये न्हाऊन निघणार आहे. टिळक मैदान व डी. जी.राेडवर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ व्या शतकापासून शहरात सुरु असलेल्या रंगपंचमीच्या सामन्याची परंपरा नवी पिढीही अधिक आनंदाने नव्या जमान्यातही जपत आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असणाऱ्या शहरात रंगांची उधळण करत रंगणारे रंगांचे सामने हे येवल्याच्या रंगोत्सवाचे वैशिष्ट! रंगपंचमीला अगदी सकाळपासूनच शहरात रंग खेळण्याला सुरुवात होते. काळानुरूप या उत्सवात बदल होत आहे. मात्र, रंगाचे सामने आजही तितक्याच उत्साहात खेळले जातात. उत्सवप्रेमींचे अन तालमीचे गाव असल्याने रंगपंचमीला येथील तालमी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येऊन बैलगाडीवर ठेवलेल्या पिंपांतील रंग, ढोल-ताशे, हलकडीच्या गजरात परस्परांवर उधळून मजा लुटत. दोन्ही बाजूंच्या किमान ४० ते ५० बैलगाडय़ा व त्यावर असणाऱ्या पिंपांतील रंगांचे सपके परस्परांवर मारून रंगपंचमी साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. आता तालमीसह विविध गणेश मंडळे, सांस्कृतिक मंडळे एकत्र येऊन परंपरागत रंगांचे सामने खेळतात.
पूर्वीच्या बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. पूर्वीच्या मामलेदार गल्लीतील सामन्यांची जागा आता टिळक मैदानाने घेतली. वाजत-गाजत हलकडीच्या ढोलताशांच्या गजरात जोशपूर्ण रंगांच्या सामन्यांना सुरूवात झाली की सायंकाळी सहा वाजल्यानंतर किमान अर्धा ते पाऊस तास रंगांचे सामने चालतात, हे मनोहारी दृष्य केवळ वर्णन करून भागणार नाही तर यासाठी प्रत्यक्ष एकदा रंगपंचमीची मजा लुटण्यासाठी येवल्याला यावेच लागेल. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता टिळक मैदान व डीजीराेडवर रंगांचे अनोखे सामने आजही पार पडतात. रंगपंचमीच्या सामन्यांची सुरूवात पाहुण्यांना पुष्पहार घालून, सत्कार करून परस्परांना अलींगन देऊन होते. रंगपंचमीला सामने खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी येवलेकर सज्ज झाले आहे. रविवारी टिळक मैदानात पाच वाजता तर त्यापाठोपाठ डीजीराेडवर दुसरा सामना सहा वाजता होणार आहे. शहरातील ही परंपरा उत्साहाने, आनंदाने व कुठेही गालबोट न लागता पार पाडावेत, सर्वांनीच आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन रंगपंचमी उत्सव समितीने केले आहे.
दीडशे वर्षांची परंपरा
एकमेकावर रंग फेकण्याची रंगत आपण सर्वत्र पाहतोपण हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्र आले अन् रंगशिंपडण्याचे सामने खेळले..असे होऊ शकते यावरविश्वास बसत नाही. परंतु मागील दीडशे वर्षे हे प्रेमाने सुरू आहे. अगदी तल्लीन होऊन अन् देहभान विसरून एकत्र जमलेले हजारो येवलेकर....कोणी ट्रॅक्टरवर तर कोणी मैदानात...,ट्रॅक्टर किती तर तब्बल ४० च्यावर... एकीकडे १५-२०, तर दुसरीकडे १५-२० रंगांच्या टिपानी भरलेले ट्रॅक्टर आमने-सामने अन् येवलेकर एकमेकांवर रंगाची उधळण करताय....असा अनोखा सप्तरंगी कलगीतुरा येथील टिळक मैदानात व डीजीराेडवर रोडवर ढोल-ताशाच्या गजरात पुन्हा एकदा रंगणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.