आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापाचा शाेध:सवंदगाव शिवारात आढळला दुर्मिळ इंडियन ब्लॅक काेब्रा

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सवंदगाव शिवारात मंगळवारी दुपारी एक दुर्मिळ जातीचा इंडियन ब्लॅक काेब्रा आढळून आला. सर्पमित्रांनी हा काेब्रा पकडून सुरक्षितस्थळी जंगल अधिवासात साेडला.एका पत्र्याच्या शेडमध्ये साप असल्याची माहिती सर्पमित्र नितीन साेनवणे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पाेहाेचून पाहणी केली असता सदर ठिकाणी सापाची काळसर रंगाची कात दिसली. यावरून त्यांनी साप काळ्या रंगाचा असल्याचा अंदाज व्यक्त करत काळजीपूर्वक जवळील चाऱ्यामध्ये सापाचा शाेध घेतला. यावेळी पूर्णपणे काळ्या रंगाचा नाग आढळून आला. त्यांनी त्याला माेठ्या शिताफीने पकडून प्लॅस्टिकच्या बरणीत बंदिस्त केले. हा नागांमधील ब्लॅब काेब्रा असल्याचे साेनवणे यांनी सांगितले. हा काेब्रा अत्यंत विषारी असून ताे दुर्मिळ आढळून येताे. त्याची लांबी साधारण साडेपाच फूट हाेती. वनविभागाकडे नाेंद करून त्यांनी काेब्राला सुरक्षितपणे मानवी वस्त्यांपासून दूर साेडून दिले.

बातम्या आणखी आहेत...