आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासन प्रक्रिया राबविणार:मृद व जलसंधारणमध्ये 670 पदांसाठी भरती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागात ‘गट ब’ (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदांची सरळसेवेने भरती करण्यास शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. मार्च २०२३ मध्ये परीक्षा होईल. परीक्षेचा कालावधी १५ मार्च ते ३० एप्रिल असेल. निकाल व त्यानुसार निवड सूची १५ ते ३१ मे २०२३ पर्यंत होईल. तर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश १ जून २०२३ पूर्वी द्यावे लागतील. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीत नाशिक जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...