आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळगाव येथे शेतकरी नेत्यास अभिवादन:शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या आठवणींना उजाळा

येवला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा नेता शेतकरी नेते शरद जोशी आज हयात नसले तरी त्यांचा विचारांची प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांसाठी लढत राहू, अशी शपथ घेत शेतकरी संघटनेच्या धुळगाव येथील कार्यकर्त्यांनी जोशी यांना अभिवादन केले.शरद जोशी यांच्या या विचाराने प्रेरित होऊन येथील शेतकरी संघटनेचे नेते कै.मोहनराव गुंजाळ यांनी राज्यभर विविध आंदोलनातून शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. याची आठवण आजही धुळगाव येथील संघटनेचे कार्यकर्ते जपून आहेत. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, युवक आघाडीचे योगेश सोमवंशी, विठ्ठल वाळके, मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी जोशी यांच्या कार्याला उजाळा दिला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे झुंजार नेते म्हणून शरद जोशी यांची ओळख होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात, कापूस आदी पिकांच्या भावासाठी त्यांनी आंदोलन केले. १९८० मध्ये नाशकात कांदा आणि ऊस दराप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव घराघरात पोहोचले. शेतकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. जोशी यांच्या अनेक आठवणींना येथील कार्यकर्त्यांनी उजाळा दिला तर त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी आम्ही भांडत राहू असे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश सोमवंशी, विठ्ठल वाळके, मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके, वाल्मीक गायकवाड, प्रवीण गायकवाड, सोमनाथ गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, नीलेश महाले, प्रभाकर भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...