आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड:बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेड; धनादेश न वटल्याने चांमकोच्या चार कर्जदारांना तुरुंगवास व दंड

चांदवड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि चांदवड मर्चंट‌्स को-ऑप. बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचे धनादेश बाउन्स झाल्याने न्यायालयाने येथील चार कर्जदारांना तुरुंगवास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. बँकेने त्यांचे सभासद कर्जदार इरफान इसाक खान (रा. चांदवड), राहिलाबेगम इरफान खान (रा. चांदवड), तसनीम अशपाक खान (रा. चांदवड), रिजवाना इश्तियाक खान (रा. चांदवड) यांना प्रत्येकी एक लाख ९५ हजार रुपये नजरगहाण कर्ज व तसनीम अशपाक खान यांना १५ हजार रुपये कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करून अदा केले होते.

या कर्जाच्या परतफेडीसाठी कर्जदारांनी बँकेस धनादेश दिलेले होते. मात्र, सदरचे धनादेश बाउन्स (अनादरीत) झाल्याने बँकेने त्यांच्याविरुद्ध कलम १३८ नुसार चांदवड न्यायालयात फौजदारी खटले दाखल केलेले होते. सदर खटल्यांत फिर्यादी बँकेने दाखल केलेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे कर्जदार इरफान इसाक खान, राहिलाबेगम इरफान खान, तसनीम अशपाक खान यांना दोषी धरून न्यायाधीश एस. बी. वाळके यांनी त्यांना प्रत्येकी सहा महिने तुरुंगवास व तीन लाख रुपये दंड, रिजवाना इश्तियाक खान यांना सहा महिने तुरुंगवास व दोन लाख ९५ हजार रुपये दंड व सदर दंड न भरल्यास प्रत्येकी दोन महिने अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसनीम अशपाक खान यांना दोन महिने तुरुंगवास व ३० हजार रुपये दंड व सदर दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. फिर्यादी बँकेतर्फे वसुली अधिकारी लक्ष्मण जगन्नाथ आव्हाड व अ‍ॅड. विशाल व्यवहारे यांनी कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...