आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नायलाॅन मांजात अडकलेल्या जखमी शिक्रा पक्ष्याला जीवदान‎

सायखेडा‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरलपूर शिवारात शिक्रा शिकारी‎ पक्षी नायलॉन मांजात अडकून‎ गंभीर जखमी झाला. निफाडचे‎ पक्षीमित्र डाॅ. उत्तम डेर्ले यांनी‎ तातडीने उपचार केल्याने शिक्राला‎ जीवदान मिळाले.‎ बुधवारी (दि. ८) सकाळी‎ दवाखान्यात डाॅ. डेर्ले बसले असता‎ रसलपूरचे रहिवासी धीरज जाधव हे‎ एका पिशवीत जखमी पक्षी घेऊन‎ आले असता तो शिकारी पक्षी शिक्रा‎ हाेता.

त्याची मान नायलॉन मांजात‎ अडकल्याने जखम झाली. मानेला‎ गळफास बसल्याने हालचाली मंद‎ होत आहेत. हे डाॅक्टरांच्या लक्षात‎ आले. तातङीने त्यांनी प्राथमिक‎ उपचार केले. त्याला जीवदान‎ देण्यास यश आले.‎ सध्या त्याला देखभालीखाली‎ ठेवले असून त्याला कोंबडीचे मांस‎ खाद्य म्हणून ठेवले आहे. बरा‎ झाल्यानंतर त्याला आधिवात साेडून‎ देण्यात येणार आहे. नायलॉन‎ मांजाचा वापर कायद्याने बंद‎ असूनही सर्रास वापर होत‎ असल्याने पक्षी-वन्यजीव, मनुष्य‎ यांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे‎ लागत आहे. यामुळे नायलाॅन‎ मांजाचा वापर करू नये, असे‎ आवाहन डॉ. डेर्ले यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...