आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोड्यांची सुटका:सायखेड्यात पुरात अडकलेल्या गाय व दोन घोड्यांची सुटका

सायखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक व सायखेडा परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली. त्यात गाय व दोन घोडे सायखेडा नदीकाठी पाण्यामध्ये बुडताना किसन जाधव यांना दिसले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख सागर गडाख यांना कळविले. सागर गडाख हे विलास सूर्यवंशी, फकिरा धुळे, बाळू आंबेकर, किरण वाघ, कृष्णा धोंडगे, अजय चारुस्कर, वैभव जमदाडे आदी घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य बोट घेऊन नदीपात्रात उतरले. पुरात अडकलेल्या गाय व दोन घोड्यांना बोटीत घेत सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सायखेडा पुलाजवळील शेतात पाणी घुसले. बाजारतळावर पाणी आल्यामुळे गुरुवारचा बाजार काॅलेजरोड येथे स्थलांतरित करण्यात आला. चांदोरी येथेही खंडेराव मंदिराच्या परिसरात पुराचे पाणी पसरले. शिंगवेला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदाकाठावरील विहिरीत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे पाणी पिऊ नये, असे आवाहन ग्रामपालिकेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...