आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवंशाचीसुटका:गोरक्षकांच्या मदतीने कत्तलीला जाणाऱ्या चार गोवंशाचीसुटका

मालेगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून मनमाड चौफुलीकडे बेकायदा वाहतूक होत असलेली चार गोवंश जनावरे पिकअप गाडीसह जप्त करण्यात आली आहेत. गोरक्षकांच्या मदतीने छावणी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी विलास प्रकाश वाघ (रा. वॉटर टँकजवळ, नामपूर, ता. बागलाण) व मुकेश विठ्ठल मोरे, (रा. वासूळ, ता. देवळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, विलास जगताप, बहादूर परदेशी यांनी छावणी पोलिसांना बेकायदा गोवंश वाहतुकीची माहिती दिली होती. पिकअप (एमएच १६ क्यू ५९८९) वाहनातून चार गोवंशाची राष्ट्रीय एकात्मता चौकाकडून मोसम पूलमार्गे जुना आग्रारोडने मनमाड चौफुलीच्या दिशेने वाहतूक होणार होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता जनावरांच्या वाहतुकीची कागदपत्रे मिळून आली नाहीत. पोलिस शिपाई कैलास श्यामराव सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...