आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) च्या वतीने इतर मागास वर्ग (ओबीसी), विशेष मागास वर्ग (एसबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजे-एनटी) समाजाच्या नॉन क्रीमीलेयर गटाच्या संपूर्ण राज्यातील युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. विनामूल्य निवासी पूर्णवेळ स्वरूपाचे हे प्रशिक्षण असून राज्यातून ९५० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, २९ डिसेंबरला पात्रता परीक्षा, कादपत्रांची पडताळणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड झाल्यानंतर लागलीच २ जानेवारीपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील.
प्रशिक्षणासाठी किमान वयोमर्यादा १८ ते ३५ वर्ष आहे. तर प्रशिक्षणाचा कालावधी ०६ ते १२ महिने आहे. उमेदवार हा किमान दहावी, बारावी, आयटीआय, अभियांत्रिकी डिप्लोमा/डिग्री प्राप्त असावा. त्यानुसारच त्याला रोजगारासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणचे आयोजन इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद येथे करण्यात आलेले आहे. गरजूंनी नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी तसेच नोंदणीसाठी या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. https://forms.gle/sy8DZHC55qQZ1vKM8 विद्यार्थ्यानी संबंधित संकेतस्थळावरून माहिती घेऊन त्यानुसार प्रशिक्षण वर्गासाठी नावनाेंदणी करावी. या प्रशिक्षण वर्गाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.