आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा पूर्ववत

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात आला. जलवाहिनीची गळती दुरुस्त केल्यानंतर पहाटे ५.४२ वाजता जलकुंभात पाणी पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वसाहतीत टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

सोमवारी जलवाहिनीला गळती झाल्यानंतर पुरवठा बंद करण्यात आला होता. दुरुस्तीसाठी तीन दिवस लागले. तोपर्यंत औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर पाणीटंचाई संकट निर्माण झाले. पाणी नसल्याने ३०० उद्योगांची उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली होती तर पिण्यास पाणी नसल्याने शंभरहून अधिक उद्योजकांनी कामगारांना सुटी देत कारखाने बंद ठेवले होते. पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे उद्योजकांत संताप व्यक्त केला जात होता.‌

उत्पादन पूर्वपदावर
गुरुवारी पाणीपुरवठा सुरू होईल या आशेवर आजही कामगार बसून होते. काही भागात दुपारी चार वाजेपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचले नव्हते. मात्र थोड्याफार उपलब्ध झालेल्या पाण्यावर कारखान्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत उत्पादन घेण्यास सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...