आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:पाच ग्रामपंचायतींच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल; निमगाव ग्रामपंचायतीत हिरे विकास पॅनलच्या जयश्री बागूल विजयी

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल साेमवारी (दि. ६) घोषित करण्यात आला. निमगावला कर्मवीर दादाजी हिरे विकास पॅनलच्या उमेदवार जयश्री बागूल ४५१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलच्या राजसबाई हिरे यांचा पराभव केला. हिरे यांना २८५ मते मिळाली. ढवळेश्वरच्या वॉर्ड क्रमांक पाचच्या लढतीत संगीता सोनवणे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. येथे माधुरी माळी यांनी ११८ मते मिळवून विजय प्राप्त केला.

अजंगला अनुसूचित जाती स्त्री राखीव जागेच्या लढतीत सविता गरुड यांनी ५०५ मते मिळवून बाजी मारली. अस्ताणेच्या अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागेवर साेनाली नवर या विजयी झाल्या. त्यांना ३८६ मते मिळाली. दहिवाळच्या एका सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत सुशीलाबाई बागूल यांनी विजय मिळविला. त्यांनी २९९ मते मिळवून दिलीप जगताप यांचा पराभव केला. ढवळेश्वरच्या दोन जागांसाठी चौरंगी लढत झाली. वॉर्ड क्रमांक तीनमधून साेमनाथ पवार ३६० मते मिळवून निवडून आले.

या ग्रामपंचायतींसाठी झाली पोटनिवडणूक
विविध कारणांनी रिक्त झालेल्या अजंग, ढवळेश्वर, दहिवाळ, अस्ताणे व निमगाव ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी पाेटनिवडणूक झाली. रविवारी (दि. ५) मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमाेजणी करण्यात आली. मतमोजणीसाठी सहा टेबलांची व्यवस्था करण्यात आली हाेती.

बातम्या आणखी आहेत...