आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:शाळांच्या नूतनीकरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर ; शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी अडीच कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. तर मनमाड येथील नगरपरिषद शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी साडेसात कोटी रुपयांच्या निधीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. अंजूम सुहास कांदे यांनी नांदगाव तालुक्यात नगरपरिषद शिक्षण मंडळांच्या शाळांना भेटी देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना शाळेच्या इमारती जीर्ण झाल्यामुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यांनी शाळांची झालेली दुरवस्था आमदार सुहास कांदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी जीर्ण झालेल्या शाळांच्या इमारतींच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. बुधवारी (दि. ८) नांदगाव व मनमाड नगरपरिषद शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी एकूण दहा कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे नगरपरिषद शाळांच्या जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने नांदगाव, मनमाड पालिकेच्या शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण आहे.

लवकरच इमारत दुरुस्तीचे काम सुरू होणार ^नगरपरिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोक्याचे असल्याचे लक्षात येताच नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यांनी त्वरित त्यास मंजुरी दिली लवकरच सर्व शाळेच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरू होईल व विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येईल. - सुहास कांदे, आमदार

बातम्या आणखी आहेत...