आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध मागण्यांचे निवेदन:एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या साेडविण्यासाठी प्रयत्नशील; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची ग्वाही

कळवण22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस. टी. मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या भविष्यकाळामध्ये सरकारच्या वतीने कशा तत्काळ सोडवण्यात येतील यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही माजी मंत्री तथा शेतकरी नेते सदाभाऊ खाेत यांनी दिली.एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या यशानंतर प्रथमच खोत यांनी कळवण आगाराला भेट दिली. यावेळी एस. टी. कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

खाेत म्हणाले, एटीएस, डीएम, टीआय या विभागात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक करून नाहक त्रास देत असल्याचे कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करताना निदर्शनास आले. परंतु हे शिंदे-फडणवीस सरकार आता एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, हे या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. यासंदर्भामध्ये पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांची एक व्यापक बैठक लावून या कामगारांच्या समस्यांवर मी आणि आमदार गोपीचंद पडळकर मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पुढच्या महिन्यात संघटनेच्या दृष्टीने राज्यभर दौरा काढून प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. यावेळी कळवण आगारातील अनुप खैरनार, मन्साराम चव्हाण, वाल्मीक गोसावी, अनिल सोनवणे, योगेश शेलार, राहुल सोनवणे, दीपक काकुळते, नाना गांगुर्डे, पप्पू भोये, दत्तू ढुमसे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...