आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सहकार विकास पॅनलने १५ पैकी ८ जागा जिंकत सत्ता काबीज केली. दुसरीकडे माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा विकास पॅनलला ७ जागा मिळाल्या. सोसायटी गटात सहकार विकासचे नितीन आव्हाड (५७), माधव आव्हाड (५५), रामनाथ कर्पे (५५), माणिक गडाख (५३), संजय गोराणे (५३), भागवत चव्हाणके (५४) आणि युवराज तुपे (५५) विजयी झाले. तर जनसेवा विकासचे कैलास कातकाडे (३८), ताराबाई बहिरू कोकाटे (३८), छबू थोरात (३९), रामदास दळवी (३६), अमित पानसरे (४०), ज्ञानेश्वर बोडके (३९), सुखदेव वाजे (४२) यांना पराभव पत्करावा लागला.
कृषी निगडित सहकारी संघ गटात सहकार विकासचे अरुण वाजे (१५) विजयी झाले. तर जनसेवाचे विठ्ठल राजेभोसले (२) यांना पराभव पत्करावा लागला. इतर मागास प्रवर्गात जनसेवा विकासचे राजेंद्र सहाने (४२०) यांनी सहकार विकासचे रामदास सहाने (३७०) यांना पराभूत केले. व्यक्तिगत सर्वसाधारण गटात जनसेवा विकासचे विशाल आव्हाड (३४१), पोपट सिरसाठ (३४९) यांनी सहकार विकासचे कैलास निरगुडे (२९९) आणि अजय सानप (२७९) यांचा पराभव केला. भटक्या विमुक्त जाती जमाती गटात जनसेवाचे लहानू भाबड (४१०) यांनी सहकारचे विलास लहाने (३७७) यांना पराभवाची धूळ चारली. महिला राखीव गटात जनसेवा विकासच्या सुशीला राजेभोसले (४२१) आणि निशा अरुण वारुंगसे (४१५) यांनी सहकारच्या हिराबाई विठोबा उगले (३४४) आणि शांताबाई देवराम कहांडळ (३४७) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती गटात रावसाहेब आढाव (४२०) यांनी राजेश नवाळे (३४४) यांचा पराभव केला.
सोसायटी गटात कोकाटे तर व्यक्तिगतमध्ये वाजेंचा प्रभाव
सोसायटी गटात मतदारांचे झालेले ठराव आमदार कोकाटे गटाच्या पथ्यावर ठरले. ९७ पैकी तब्बल ५९ मतदार कोकाटे यांच्या डेऱ्यात होते. कृषी निगडित गटातही १८ पैकी १६ मतदार कोकाटे गटासोबत होते. त्यामुळे सोसायटीच्या सात आणि कृषी गटातील एक अशा ८ जागा सहजगत्या त्यांना मिळाल्या. ५ वर्षे सत्ता ताब्यात असल्यामुळे वाजे गटाने वाढवलेली व्यक्तिगत सभासद संख्या खालच्या ७ जागा जिंकून देण्यात महत्त्वाची ठरली. मात्र त्यांना सत्ता राखता आली नाही.
शाब्दिक घमासन, वातावरण तंग
सिमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता ताब्यात आल्याने या निवडणुकीच्या यशाचे श्रेय कार्यकर्त्यांनी त्यांना दिले. दोन्ही बाजूंनी प्रचंड शाब्दिक घमासन पाहायला मिळाले. भारत कोकाटे यांनी काही सचिवांना मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होण्यास आक्षेप घेतला. कोकाटे गटानेही भारत कोकाटे सभासद नसल्याने त्यांना मतमोजणीला उपस्थित राहू दिले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.