आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन करण्यात इशारा:सायखेडा पूल धोकादायक; तात्पुरते रिफ्लेक्टर बसवा

सायखेडा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी नदीवरील सायखेडा येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पानवेलींच्या दबावाने खिळखिळा झाला आहे. या पुलावर तात्पुरते रिफ्लेक्टर बसवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अश्पाक शेख यांनी दिला आहे.

गोदावरीला नुकताच पूर येऊन गेला. त्यामुळे सायखेडा पुलावर असलेले लोखंडी गार्ड उघडे पडले आहेत. पाच ते सहा ठिकाणी पुलावर खटक्या पडल्या आहेत. या पुलावर दोन्ही बाजूंनी पुराचा गाळ साचला आहे. या पुलाला कथडे नाही. त्यामुळे साईडपट्टया दुरुस्त करण्याबरोबरच कथडे अथवा लोखंडी रेलिंग बसविणे गरजेचे आहे. पुलावर अंधार राहत असल्याने तात्पुरते रिफ्लेक्टर उभे करणे गरजेचे आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सदस्य अश्पाक शेख यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...