आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. साैंदाणेच्या सर्वाधिक १५ जागा अविराेध झाल्या आहेत. करंजगव्हाणच्या ७ तर शिरसाेंडीच्या ६ जागा अविराेध झाल्या. राेंझे सरपंचपदाची जागा अविराेध झाली.दाभाडी, साैंदाणे, वजीरखेडे, टाेकडे, जाटपाडे, माल्हनगाव, निंबायती, शिरसाेंडी, पाटणे, करंजगव्हाण, माेहपाडे, चाैकटपाडे व राेंझे या १३ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. शेवटच्या दिवशी शुक्रवारी ४८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सरपंचपदासाठी ६८ तर सदस्यपदांचे ४१५ अर्ज समाविष्ट हाेते.
साैंदाणे ग्रामपंचायतीच्या १८ पैकी १५ जागा अविराेध झाल्या. यात शुभांगी सचिन पवार, मीना संजय माळी, चंद्रकांत केशवराव पवार, महारू उखा साेनवणे, कल्पना दीपक अहिरे, साेनाली शरद पवार, प्रवीण छाजेड, उत्तरा पवार, रत्ना दादासाहेब पवार, शशिकांत पवार, मनीषा पवार, किरण पवार, युवराज खैरनार व राजसबाई पवार यांचा समावेश आहे. करंजगव्हाणला सुदाम अभिमन जाधव, पद्माबाई बाेरसे, कविता ह्याळीज, राजेंद्र बाेरसे, अरुणाबाई गांगुर्डे, सविता मालपुरे, मंगला कदम हे उमेदवार अविराेध झाले आहेत.
शिरसाेंडीच्या सरपंचपदासाठी दुरंगी लढत आहे. सदस्यपदासाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. वाॅर्ड एकमधून कविता बाेरसे, समाधान बाेरसे, समाधान केशव बाेरसे तर वाॅर्ड ३ मधून कविता चव्हाण, भाऊसाहेब पवार व मीना वाकचाैरे अविराेध झाले आहेत. राेंझेच्या सरपंचपदी सुमन गायकवाड यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची अविराेध निवड निश्चित झाली आहे. इतर ठिकाणी अटीतटीच्या लढती हाेत आहे. माघारीनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.