आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:सायने फाट्याजवळ बसची पिकअपला धडक; बसमधील तीन प्रवासी जखमी

मालेगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवघटकडे जाणाऱ्या मालेगाव आगाराच्या बसने पिकअपला धडक दिली. मंगळवारी सायंकाळी सायने फाट्याजवळ झालेल्या अपघातात बसमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. यात दाेन महिला व एका दाेन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचालकाने वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघात झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बसचालक योगेश्वर बच्चे व वाहक नितीन शेवाळे मालेगावहून ४६ प्रवाशांसह देवघट मुक्कामी बस (एमएच ०७ सी ७०९२) घेऊन जात होते. यादरम्यान बसने मल्लीनाथ मंदिराजवळ समोरून येणाऱ्या पिकअपला (एमएच ४१ एजी २६१५) धडक दिली. यामुळे बसमधील प्रवासी प्रियंका महेश पवार (२३), आशा व्यंकट पवार (४५) व ओमकार महेश पवार (२, सर्व रा. दहिवाळे) हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी हलविले. आगार व्यवस्थापक किरण धनवटे यांनीही तातडीने अपघात ठिकाणी पाहणी करून रुग्णालयात पोहोचून जखमी प्रवाशांची विचारपूस केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे

बातम्या आणखी आहेत...