आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिडा:वेटलिफ्टिंगमध्ये साईराजला सुवर्णपदक ; स्पर्धेत घवघवीत यश संपादन

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरकोईल येथे सुरू असलेल्या यूथ ज्युनिअर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत जयभवानी व्यायामशाळेच्या व केआरटी विद्यालय मनमाडच्या साईराज परदेशी याने पहिल्याच राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीत शिकत असलेल्या साईराजने ७३ किलो वजनी गटात सहभागी होत स्नॅचमध्ये ११७ किलो व क्लीन जर्कमध्ये १३९ किलो असे एकूण २५६ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले.

बातम्या आणखी आहेत...