आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव:साक्षी भावसारची अखिल भारतीय‎ अंतर विद्यापीठ बेसबॉल संघात निवड‎‎

मालेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मसगा महाविद्यालयातील‎ विद्यार्थिनी साक्षी योगेश भावसार‎ हिची अखिल भारतीय अंतर‎ विद्यापीठ बेसबॉल संघात निवड‎ झाली आहे.‎ तिने विभागीय स्पर्धेमध्ये‎ उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे‎ तिची निवड झाली. दि. २४ फेब्रुवारी‎ रोजी आसाम येथे होणाऱ्या अखिल‎ भारतीय स्पर्धेत ती सहभागी होणार‎ आहे. यासाठी तिचा मालेगाव व पुणे‎ येथे सराव सुरू आहे.

या निमित्त‎ आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष‎ समिती व भावसार समाजा तर्फे‎ तिचा सत्कार करण्यात आला.‎ प्रा. डॉ. सुरेखा दप्तरे, व प्रा. डॉ.‎ दिनेश कराड यांचे मार्गदर्शन‎ लाभल्याचे साक्षी हिने सांगितले.‎ सत्कार समारंभाला निखिल पवार,‎ प्रा. अनिल निकम, देवा पाटील,‎ सुशांत कुलकर्णी, प्रवीण खैरनार,‎ मुन्ना पाटील, अनिल पाटील, गणेश‎ लोखंडे आदींसह नागरिक उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...