आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संघटनेचे संस्थापक:शरद जोशी यांना अभिवादन

नामपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भदाणे, बाजार समिती सभापती कृष्णा भामरे, खेमराज कोर, माजी सरपंच संभाजी सावंत, बाजार समिती संचालक संजय भामरे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, ग्यानदेव कोर, विनोद पाटील, कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी शरद जोशींच्या जीवनपटावर माहिती दिली. बाजार समितीच्या आवारात लवकरच जोशी यांचा पुतळा उभारण्याची घोषणा सभापती कृष्णा भामरे यांनी केली.

यावेळी माणिकराव देवरे, बाळकृष्ण चौधरी, प्रवीण आंबसनकर, भाऊसाहेब भामरे, संदीप ब्राह्मणकर, आनंदा मोरे, हेमंत सावंत, शशिकांत सावत, भाऊसाहेब कांदळकर, शामराव अहिरे, डोगर पगार, दिलीप भामरे, सचिव संतोष गायकवाड अादींसह बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...