आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने झारखंड येथील सम्मेद शिखर तीर्थधाम पर्यटनस्थळ म्हणून घाेषित केले आहे. या निर्णयास विराेध करत बुधवारी (दि. २१) सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना निवेदन देण्यात आले. सकल जैन समाजाच्या वतीने चांदवड व वडाळीभोई येथे आपले आर्थिक व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
येथील गुजराथ गल्लीतील जैन मंदिरापासून मूक मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चा सोमवार पेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष अशोक कापडिया, श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे संघपती जवरीलाल संकलेचा, खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र कासलीवाल, सुधर्म आराधना केंद्राचे अध्यक्ष किशोर डुंगरवाल, श्री नेमिनाथ संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड, वडाळीभोई सकल जैन संघाचे संघपती पिंटू संचेती, णमोकार तीर्थक्षेत्र मालसाणेचे ट्रस्टी पूनम संचेती, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, राजकुमार संकलेचा, सुनील डुंगरवाल, नंदू पारख, जितेंद्र डुंगरवाल आदींसह सकल जैन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील जैन बांधवांनी बुधवारी प्रांत कार्यालयावर धडक माेर्चा काढला. दुपारी सटाणानाका भागातील अहिंसा सर्कलपासून माेर्चाची सुरुवात झाली. घाेषणाबाजी करत हाती मागणीचे फलक घेत माेर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. सम्मेद शिखर हे जैन समाजाचे पवित्र धार्मिकस्थळ आहे. मात्र, केंद्र सरकारने या तीर्थधामास इकाे टुरिझम स्थळ घाेषित केले आहे. सदर निर्णयामुळे धार्मिकस्थळाचे पावित्र्य धाेक्यात येणार आहे. सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करावा. तसेच हे तीर्थधाम जैन समाजाचे सर्वात पवित्र तीर्थधाम म्हणून घाेषित करावे, अशी जाेरदार मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना देण्यात आले. माेर्चात विविध जैन संघटना व समाजबांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.