आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुग्णाला केस पेपर देण्याची, रुग्णाला ड्रेसिंग करण्याची जबाबदारीही स्वच्छता कर्मचाऱ्यांवरच, एक्स-रे रूममध्ये कर्मचारी नसल्याने ही सुविधाही बंद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने तेथेही शुकशुकाट. परिणामी, ग्रामीण रुग्णालय सिन्नरकरांसाठी केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे ‘दिव्य मराठी''च्या पाहणीत दिसून आले. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे डॉक्टर आणि स्टाफ नर्स २४ तास तर स्वच्छता कर्मचारी सलग १२-१२ तास काम करत असल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर तणाव जाणवत आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या एमव्हीजी कंपनीने कॉन्ट्रॅक्ट संपल्याने ४ वाॅर्ड बॉय, २ लॅब टेक्निशियन, ४ स्टाफ नर्स आणि १ एक्स-रे टेक्निशियन अशा ११ लोकांना ३१ जानेवारीपासून कामावरून कमी केले आहे. परिणामी ३ डॉक्टर, ५ सफाई कर्मचारी, १ फार्मासिस्ट, वाहन चालक आणि ३ स्टाफ नर्स यांच्यावरच रुग्णालयाचा भार येऊन पडला आहे.
त्यामुळे एका शिफ्टमध्ये केवळ ४ ते ५ कर्मचाऱ्यांवरच दवाखाना चालवण्याची वेळ अधीक्षकांवर आली आहे. विशेष म्हणजे, ३ पैकी बालरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. चेतन ठोंबरे यांच्याकडे अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तेही अतिरिक्त कामाने तणावात असून त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे ४ वेळा या पदाचा राजीनामा देऊनही तो स्वीकारला गेलेला नाही.
पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसल्याने एकेका डॉक्टरला प्रत्येकी २४ तास काम करावे लागत आहे. स्टाफ नर्सची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. स्वच्छता कर्मचारी अपुरे असल्याने त्यांनाही एवढ्या मोठ्या रुग्णालयाची स्वच्छता करून पुन्हा रुग्णालयातील इतर कामकाजास मदत करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. नागरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आरोग्य सेवेकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.
वेतन अल्प मात्र तेही वेळेवर नाही...
मनुष्यबळ पुरवणाऱ्या एमव्हीजी कंपनीने ठेकेदारी पद्धतीने काही कर्मचारी ११ महिन्यांच्या तर काही तीन वर्षांच्या कराराने भरले आहेत. ११ महिन्यांचा करार असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी केवळ ७ हजार इतके वेतन दिले जाते. मात्र, तेही दोन ते तीन महिने मिळत नसल्याची तक्रार येथील कर्मचाऱ्यांनी केली.
नागरिकांना आर्थिक भुर्दंड
रुग्णालयात एक्स-रे आणि प्रयोगशाळेची व्यवस्था असतानाही केवळ कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना या सेवेसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी त्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. धनुर्वाताचे आणि श्वानदंशाचे इंजेक्शनही संपलेले आहे. खोकल्याचे औषधही रुग्णालयात उपलब्ध होत नाही.
रुग्णांच्या रोषाचा करावा लागतो सामना
उपसंचालकांकडे वाढीव कर्मचारी पुरवठा व्हावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात येते. वारंवार पाठपुरावा करूनही कर्मचारी मिळत नसल्याने १३ कर्मचाऱ्यांवर काम करणे अवघड होवून बसले आहे. त्यामुळे रुग्णांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. जादा काम करावे लागत असल्याने कर्मचारी तणावात आहेत. - डाॅ. चेतन ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, सिन्नर.
दररोज २००-२५० रुग्णांची तपासणी
नगरपालिकेचा दवाखाना बंद झाल्यापासून ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी वाढली आहे. रुग्णालयात दररोज २०० ते २५० रुग्ण बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी येतात. मनुष्यबळ अपुरे असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘जिथे कमी, तिथे आम्ही'''''''' अशी भूमिका बजावावी लागते. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी दंत तपासणी, बुधवारी लहान मुलांचे लसीकरण तर गुरुवारी डोळे तपासणी शिबिर हा अतिरिक्त भार सहन करताना डॉक्टरांसोबतच इतर कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.