आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जोपूळ विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय दगूजी जाधव तर उपाध्यक्षपदी दीपक भिका वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली.
सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या गटाला १२ पैकी १२ जागा मिळवत घवघवीत यश प्राप्त झाले होते. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्षपदी संजय जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असताना संचालक मंडळाची एकवाक्यता दर्शवण्यासाठी सर्वानुमते युवा सदस्य दीपक वाघ यांना कार्यभार देण्याचे मंजूर झाले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक दत्तू पंढरीनाथ कोतवाल, अरुण देवराम जाधव, भाऊसाहेब ज्ञानेश्वर वाघ, केदू दौलत सावकार, कैलास रामभाऊ जाधव, लक्ष्मण शंकर जाधव, बाळू हरी जाधव, अनिता धोंडीराम पिंपरकर, मीराबाई भाऊसाहेब धामणे, परशराम प्रकाश केदारे यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेत प्रकिया पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पोपट पाटोळे यांनी काम पाहिले. त्यांना नितीन पाटील, संस्थेचे सचिव संजय ठोंबरे, लिपिक संदीप वक्ते, राहुल केदारे यांनी सहकार्य केले.
यावेळी जयराम कोतवाल, पप्पू कोतवाल, कैलास सावकार, रमण जाधव, पंडित जाधव, जयवंत जाधव, दत्तू जाधव, संदीप जाधव, अशोक जाधव, अण्णा कोतवाल, बबन पिंपरकर, मधुकर धामणे, अमोल धामणे, मोठाभाऊ वाघ, पोपट वाघ, नंदू वाघ, विलास जाधव, सोनू जाधव, रामदास सावकार, योगेश जाधव, धोंडीराम जाधव, त्र्यंबक सावकार, अर्जुन जाधव, पांडुरंग जाधव, साहेबराव जाधव, सोमनाथ जाधव, प्रभाकर जाधव, भाऊसाहेब जाधव, संजय जाधव, ज्ञानेश्वर कोतवाल, गोरख कोतवाल, दीपांशू जाधव, किशोर जाधव, कचरू केदारे, सीताराम सावकार, बाळासाहेब जाधव, दादा जाधव, उत्तम जाधव, शिवाजी जाधव, मनोहर जाधव, सुभाष जाधव, संजय सोनावणे, शिवाजी वाघ, दिगंबर कोतवाल, दादा दाते, दिलीप पिंपरकर, अमोल जाधव, अण्णा जाधव, रवींद्र केदारे, विठ्ठल गोधडे, कृष्णा केदारे, वैभव केदारे, त्र्यंबक जाधव आदींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.