आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविरोध निवड:कांचनगाव आदिवासी कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संतू भगत; उपाध्यक्षपदी बाळा गव्हाणे अविरोध

घोटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांचनगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड शिवसेनेचे गटनेते तथा पंचायत समितीचे सभापती विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अध्यक्षपदी संतू रामा भगत तर उपाध्यक्षपदी प्रकाश (बाळा) त्र्यंबक गव्हाणे यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी घोषित केले.

अध्यक्ष पदासाठी संतू भगत, उपाध्यक्ष पदासाठी प्रकाश गव्हाणे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त दाखल झाल्याने त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी संचालक देवीदास लंगडे, निवृत्ती भगत, सखाराम लाव्हरे, ज्ञानेश्वर भगत, हरिश्चंद्र भगत, कैलास भगत, शैलेंद्र चंद्रमोरे, शीतल भगत, ताईबाई भगत आदी उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांकडून घोषणा व आतषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान आडोळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, पंचायत समितीचे सभापती विठ्ठल लंगडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदलाल भागडे, पी. के. ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, उपसरपंच भगीरथ कडू, माजी उपसरपंच रामदास गव्हाणे, सतीश गव्हाणे, माजी उपसरपंच नंदू माळी, पोपट लंगडे, फुलचंद कडू, शिवसेना ज्येष्ठ नेते गोरख कडू, मच्छिंद्र कडू, लालू दुभाषे, अंकुश कडू, पिंटू गोईकणे, राजाराम गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, मुरलीधर दुभाषे, जनार्दन लंगडे, दत्तू गव्हाणे, नामदेव पाटील गव्हाणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने केल्याचे सभापती विठ्ठल लंगडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...