आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सावरगावची  पूजा गायकवाड कला शाखेत प्रथम, कावेरी काटे, रविना गायकवाडचे यश

येवला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी कॉलेज करून शेतात आईवडिलांना मदत करणाऱ्या सावरगाव विद्यालयातील तीन विद्यार्थिनी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. जिद्द, शिकण्याची उमेद आणि अभ्यासाची तळमळ असली की यश नक्की मिळते..हे या ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनींनी दाखवले आहे. सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.

अतिशय प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत अभ्यासाची जवाबदारीही निभावत पूजा गायकवाड ८२.८४ टक्के मिळवून येवल्याच्या ग्रामीण भागातून तालुक्यात पहिली आली आहे. बारावीचे वर्ष असल्याने आई-वडिलांना मदतीचा हात देत ती घरातील आईच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करायची. शिवाय उरलेल्या वेळात अभ्यास करून हे यश तिने मिळविले आहे.

द्वितीय क्रमांक कावेरी काटे हिने मिळवला असून शेतकरी कुटुंबातील असलेली कावेरी दूरवर असलेल्या वस्तीवरून सावरगावला पायी शाळेत यायची. तिनेही जिद्दीच्या बळावर ८२.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तृतीय क्रमांक रविना गायकवाड (८१.३३ टक्के) हिने संपादन केला आहे. रविना अनकुटे येथून शाळेत सायकलवर रोज यायची..तीही शेतीत व घरात मदत करून अभ्यासाची जवाबदारी पेलवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

विद्यालयाचे ४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यात १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील,सहसचिव प्रविण पाटील,युवा नेते संभाजीराजे पवार यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे, पर्यवेक्षक व्ही. एन. दराडे, जेष्ठ शिक्षक गजानन नागरे, वसंत विंचू, उमाकांत आहेर, पोपट भाटे, संतोष विंचू यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ शिक्षक साहेबराव घुगे, यशवंत दराडे, नामदेव पवार, योगेश भालेराव, राजकुवर परदेशी, कैलास मोरे, योगेश पवार,रविंद्र दाभाडे, संजय बहीरम, भाग्यश्री सोनवणे, प्रमोद दाणे, उज्वला आहेर, लक्ष्मण माळी, सगुना काळे, विकास व्यापारे, ऋषिकेश काटे,मयुरेश पैठणकर, रोहित गरुड, सुनील चौधरी,अरूण नागरे, मच्छिंद्र बोडके, लक्ष्मण सांगळे आदींनी

बातम्या आणखी आहेत...