आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सायखेडा जि. प. गटात करंजगाव; गण पूर्ववत ठेवण्याची मागणी

सायखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सायखेडा गटातील गट व गणांच्या प्रारूप आराखड्यानंतर रचनेवर हरकती घेण्याच्या मुदतीत सायखेडा गटातील करंजगाव गणासाठी ग्राम पालिका सदस्य नामदेवराव पवार यांनी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्याकडे हरकत नोंदवली आहे. १० जूनला महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात यावर सुनावणी ठेवण्यात आली आहे.

नामदेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी सायखेडा गटात सायखेडा गण व करंजगाव गण अस्तित्वात होता, पण नवीन पुनर्रचनेनुसार गटात फेरबदल करून सोनगाव गण नवीन निर्माण करण्यात आला आहे. परंतु भौगोलिक दृष्टिकोनातून गावनिहाय मतदारसंख्येचा विचार केल्यास मोठी तफावत दिसून येत आहे. पूर्वी करंजगाव गण असलेल्या गावची लोकसंख्या ५२५६ इतकी असताना केवळ ३५६७ इतकी लोकसंख्या असलेल्या व सायखेडापासून केवळ दोन किलोमीटरवर असलेल्या सोनगाव गावास गणाचा दर्जा दिला आहे.

सायखेडा हे गणाचे गाव असून लगतच्या सोनगावला गणाचा दर्जा दिल्याने त्यास सोनगाव, तळवाडे, म्हाळसाकोरे, भेंडाळी, औरंगा बागलवाडी, मांजरगाव, खान‍ थडी तारुखेडले, तामसवाडी ही गावे जोडल्याने त्यांचे अंतर २५ किलोमीटर आहे. इतके माेठे अंतर असल्याने तेथील ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

करंजगावचे नामदेवराव पवार, रावसाहेब राजोळे, सरपंच नंदू निरभवणे, चापडगावचे बबनराव दराडे, भुसे गावचे सरपंच कारभारी बेंडकुळे, पुंजाराम भगुरे यांसह नवीन प्रस्तावित झालेल्या गावातील नागरिकांनी चर्चा करून नवीन गण रद्द करून करंजगाव गण पूर्ववत करण्यात यावा, यासाठी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...