आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, भारतीय जनता पार्टीचे विचार या ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांनी केले. भाजपाच्या बुथ सशक्तीकरण अभियानांतर्गत चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (दि. ४) भारतीय जनता पार्टीचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले, त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नितीन गांगुर्डे, ज्येष्ठ नेते अशोक व्यवहारे, मोहनलाल शर्मा, सुनील शेलार, अॅड. शांताराम भवर, महिला आघाडीच्या गीता झाल्टे आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेस भुत्याणेचे माजी सरपंच गणेश महाले, योगेश ढोमसे, पुष्पाताई धाकराव, संदीप काळे, विशाल ललवाणी, प्रशांत ठाकरे, वाल्मीक पवार, डॉ. भाऊराव देवरे, बाजीराव वानखेडे, राजू पाटील, मन्सूरभाई मुलानी, मुकेश आहेर, बाळा पाडवी, महेश खंदारे, महेंद्र कर्डिले, मुकुंद बोरसे, वैशाली जाधव, संगीता पवार, उषा खैरे, मंगला भोयटे, रेखा ढोमसे, अनिता जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.