आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी:राॅबिनहुड  आर्मीद्वारा 50 हून अधिक वंचित मुलांना विज्ञान, गणिताचे धडे

सचिन जैन | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धेच्या काळात आजही वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पुरेशा शैक्षणिक सुविधा मिळत नाही. यामुळे असे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातात. याचाच विचार करत राॅबिनहुड आर्मीने वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने उपनगर परिसरात दर रविवारी ५० मुलांना माेफत विज्ञान, गणिताचे धडे दिले जातात.

स्पर्धेच्या या काळात काेणताही विद्यार्थी मागे राहू नये यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. राॅबिनहुड आर्मी ही लग्न समारंभ, पार्टी अथवा हाॅटेलमध्ये उरलेले अन्न संकलित करत गरीब लाेकांना वाटत असते. सर्वच वयाेगटातील व विविध कार्यक्षेत्रात कार्यरत राॅबिन्स सामाजिक दायित्व समाेर ठेवून हा उपक्रम राबवत असतात.

याचाच पुढचा भाग म्हणून झाेपडपट्टी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासाठी देखील राॅबिनहुड आर्मीच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे. रस्ता आणि शाळा यातील अंतर कमी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. मिशन एज्युकेशनच्या माध्यमातून संस्थेचे स्वयंसेवक उपनगर परिसरात दर रविवारी शैक्षणिक वर्ग राबवत असतात. सकाळी ९ ते ११ या वेळेत ५० पेक्षा जास्त विद्यार्थी यात सहभागी हाेत असता. या प्राथमिक ते माध्यमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असताे. या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, इंग्रजी शिकवले जाते. तसेच प्रश्नाेत्तराच्या माध्यमातून त्यांच्या अडचणींचे निरसन देखील केले जात आहे. या उपक्रमासाठी राॅबिनहुड आर्मीचे स्वयंसेवक विशेष प्रयत्न करत आहे.

सहभागासाठी करा संपर्क
राॅबिनहुड आर्मीच्या विविध उपक्रमात व फूड डाेनेशनमध्ये सहभागी हाेण्यासाठी ८९७१९६६१६४ या व्हाॅट‌्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक अन् मूलभूत विकासाकडेही लक्ष
या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक नव्हे तर चांगल्या सवयी, शिष्टाचार, सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे नियम असे जीवनातील विविध मूलभूत घटक देखील शिकवले जातात. या प्रक्रियेच्या माध्यमातून त्याचे जीवन आनंददायी बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न असताे.

बातम्या आणखी आहेत...