आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती प्राचार्या डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली.
विद्यालयातील विज्ञान विभागात स्नेहा प्रीतीश डुंगरवाल व स्नेहा तुळशीराम सोनवणे या विद्यार्थिनींनी ६०० पैकी ५०५ गुण मिळवून (८४.१७ टक्के) संयुक्त प्रथम, तेजस्विनी निवृत्ती बच्छाव हिने ४९७ गुण (८२.८३ टक्के) मिळवून द्वितीय, प्रतीक मधुकर पवार याने ४९६ गुण (८२.६७ टक्के) मिळवून तृतीय, सानिका संतोष क्षत्रिय हिने ४८९ गुण (८१.५० टक्के) मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला.
तसेच व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल (एम.सी.व्ही.सी.) विभागातून मच्छिंद्र भगत माळी (प्रथम), धनराज संजय विश्वास (द्वितीय), किरण अशोक गांगुर्डे (तृतीय) यांनी यश मिळविले.यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे नेमिनाथ संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख आदींसह संस्थेच्या विश्वस्त व प्रबंध समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.