आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:चांदवड एचएचजेबी तंत्रनिकेतनच्या 15‎ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीत निवड‎

चांदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम‎ संचालित श्री एच.एच.जे.बी.‎ तंत्रनिकेतनमधील १५ विद्यार्थ्यांची कॅम्पस‎ प्लेसमेंट ड्राइव्हदरम्यान निवड करण्यात‎ आली. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मदरसन‎ ऑटोमोटिव्हिज टेक्नॉलॉजीज आणि‎ इंजिनिअरिंग, नाशिक या कंपनीने लेखी‎ चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत या‎ मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करून यांत्रिक‎ अभियांत्रिकी विभागाच्या १५ विद्यार्थ्यांची‎ इंजिनियर ट्रेनी (DET) म्हणून चांगल्या‎ पगारासह निवड केली.

या प्लेसमेंट‎ ड्राइव्हमध्ये यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे‎ सुखदेव करे, दुर्गेश गोसावी, सचिन गोसावी,‎ तेजस सोनवणे, श्लोक गरुड, दुर्गेश भामरे,‎ भूषण गांगुर्डे, राजेंद्र जाधव, मयूर मोरे, नितीन‎ पिंपळे, अयान शेख, अमन कादरी, अरबाज‎ पठाण, कुंदन निकम, गौरव पगार या‎ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या‎ विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए.‎ वानखेडे, यांत्रिक अभियांत्रिकी विभागप्रमुख‎ डी. व्ही. लोहार, तंत्रनिकेनचे टीपीओ वाय.‎ एल. काकुस्ते व समन्वयक जी. जे. पगार‎ यांचे मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...