आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:येवल्यात सरपण व चूल विकत व फुटाणे वाटत महागाईचा निषेध

येवला6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुवरील वाढवलेल्या जीएसटीविरोधात शहरातील विंचूर चौफुलीवर सरपण, चूल व फुटाणे वाटत केंद्र सरकारचा निषेध केला.

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर व जीवनाश्यक वस्तूंवरील वाढवलेल्या जीएसटीमुळे माणसाचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने युवकांचा कोणताही विचार न करता घाईघाईने चालू केलेल्या अग्निपथ योजनेमुळे त्यांचेे भवितव्य धोक्यात आले आहे.

या सर्व बाबींमुळे तालुका व शहर काँग्रेस कमिटीने नागरिकांना फुटाणे वाटून महागाईचा प्रतीकात्मक निषेध केला. गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे प्रतीकात्मक चूल व सरपण विकून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, अण्णासाहेब पवार, राजे आबासाहेब शिंदे, अमित पटणी, विलास नागरे, बाबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, राजेंद्र गणोरे, गणपत शिंदे, सुकदेव मढवई, दत्तू भोरकडे, दयानंद बेंडके, अक्षय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...