आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र‎:स्टाइसमध्ये आज‎ चर्चासत्र‎

सिन्नर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा भाजप उद्योग‎ आघाडी व सिन्नर तालुका‎ औद्योगिक सहकारी वसाहत‎ यांच्या वतीने स्टाईसमध्ये‎ केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.‎ भागवत कराड यांच्या‎ उपस्थितीत रविवारी (दि. ८)‎ चर्चासत्राचे आयोजन केले‎ आहे. दुपारी ३ वाजता‎ स्टाईसमधील उद्योग भवन‎ कार्यालय येथे चर्चासत्र होत‎ असल्याची माहिती अध्यक्ष‎ नामकर्ण आवारे, उपाध्यक्ष‎ सुनील कुंदे, व्यवस्थापक‎ कमलाकर पोटे यांनी दिली.‎

भारत सरकार अर्थ‎ विभागाकडे जीएसटी, सेंट्रल‎ एक्साईज, आयकर, भावी‎ बजेट तसेच उद्योगासंबंधी केंद्र‎ सरकारकडे विविध चर्चा‎ करण्यासाठी या चर्चासत्राचे‎ आयोजन केले आहे. राज्यमंत्री‎ डॉ. भागवत कराड‎ उद्योजकांना मार्गदर्शन करणार‎ आहे. स्टाइसमधील सर्व‎ उद्योजक, सभासदांनी या‎ चर्चासत्रास उपस्थित राहून‎ आपल्या सूचना संस्थेच्या‎ कार्यालयात पाठवाव्यात, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...