आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय‎ कार्यशाळेचे आयोजन:नवीन शैक्षणिक धोरणावर सिन्नर‎ काॅलेजमध्ये साेमवारी कार्यशाळा‎

सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गुरुवर्य मामासाहेब‎ दांडेकर कला, भगवंतराव वाजे‎ वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी.‎ व्ही. रसाळ यांच्या‎ मार्गदर्शनाखाली दि. ६ व ७‎ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘राष्ट्रीय‎ शैक्षणिक धोरण २०२०'' या‎ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय‎ कार्यशाळेचे आयोजन करण्यात‎ आले आहे.‎ दि. ०६ फेब्रुवारी रोजी मराठा‎ विद्या प्रसारक समाजाचे‎ सरचिटणीस नितीन ठाकरे‎ यांच्या अध्यक्षतेखाली व‎ मविप्रचे सभापती बाळासाहेब‎ क्षीरसागर यांच्या हस्ते‎ कार्यशाळेचे उद्घाटन होणार‎ आहे. मविप्रचे उपाध्यक्ष‎ विश्वास मोरे, संचालक‎ कृष्णाजी भगत हे प्रमुख अतिथी‎ म्हणून उपस्थित राहणार आहेत.‎ या कार्यशाळेसाठी साधन‎ व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले‎ पुणे विद्यापीठाचे मानव्यविद्या‎ शाखेचे प्रमुख डॉ. विजय खरे,‎ श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स‎ दिल्ली येथून डॉ. एस. प्रकाश,‎ स्व. रामानंद तीर्थ मराठवाडा‎ विद्यापीठाचे माजी कुलगुरू‎ पंडित विद्यासागर, केटीएचएम‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.‎ बी. गायकवाड मार्गदर्शन‎ करणार आहेत.‎

दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी‎ राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून‎ मविप्र समाजाचे अध्यक्ष सुनील‎ ढिकले, प्रमुख अतिथी म्हणून‎ शिक्षणाधिकारी डॉ. एन. के.‎ जाधव आणि प्राचार्य डॉ. व्ही.‎ बी. गायकवाड उपस्थित राहणार‎ आहेत.‎ या कार्यशाळेसाठी‎ देशभरातून शिक्षणासह विविध‎ क्षेत्रातील तज्ञांची उपस्थिती‎ राहणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक‎ धोरणावर आयोजित केल्या‎ जाणाऱ्या या कार्यशाळेमध्ये‎ देशभरातील विविध‎ विद्यापीठांतून जिज्ञासू‎ अभ्यासक व संशोधकांनी‎ सहभाग नोंदवण्याचे आवाहन‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.‎ व्ही. रसाळ, उपप्राचार्य डॉ. डी.‎ एम. जाधव, उपप्राचार्य प्रा.‎ आर. व्ही. पवार, कार्यशाळेचे‎ समन्वयक डॉ. ए. बी. चव्हाण,‎ निमंत्रक डॉ. सी. इ. गुरुळे यांनी‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...