आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर सभा:सेना नेते आदित्य ठाकरे मंगळवारी मालेगावात; संगमेश्वरात जाहीर सभा

मालेगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील बंडखाेरी व सत्तांत्तर नाट्यानंतर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे पहिल्यांदाच मालेगावी येत आहेत. मंगळवारी सायंकाळी संगमेश्वर भागात जाहीर सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव दाैऱ्यात उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले हाेते. या आराेपांना आदित्यकडून प्रत्युत्तर अपेक्षित असून सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रविवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार घेत आदित्य ठाकरेंच्या नियाेजित मालेगाव दाैऱ्याची माहिती दिली.

ठाकरे यांचे दुपारी शहरात आगमन हाेणार आहे. राेड शाेद्वारे ठाकरेंचे स्वागत केले जाईल. यानंतर ठाकरे संगमेश्वरातील दत्त मंदिराजवळ जाहीर सभा घेतील, असे शिवसेनेचे स्थानिक नेते रामभाऊ मिस्तरी यांनी सांगितले. गेल्याच महिन्यात आदित्य ठाकरेंनी मनमाडच्या दौऱ्यात कांदे यांचा समाचार घेतला हाेता. आता ठाकरेंची ताेफ भुसेंविराेधात धडाडेल.