आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गरजू महिलांना शिलाई मशीन भेट; इनरव्हील क्लबकडून स्त्रीशक्ती उद्दिष्टांतर्गत वितरण

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील इनरव्हील क्लबच्या महिलांनी पुढाकार घेत तीन महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिले आहे. यामुळे या महिलांना हक्काचा रोजगार मिळाला असून हा मोठा आधार त्यांच्यासाठी ठरला आहे.

इनरव्हील क्लबच्या स्त्रीशक्ती या उद्दिष्टातर्गत येथील गरजूंना तीन शिलाई मशीन गरजू महिलांना वितरित करण्यात आल्या.यामुळे गरजू महिलांना कपडे, पिशव्या किंवा इतर उपयोगी वस्तू शिवून विकता येतील. त्यांना हक्काचा रोजगार मिळून अर्थप्राप्ती होणार आहे. याचबरोबर त्यांच्यासाठी सिद्धकला शिवण क्लासेस येथे मोफत शिवण क्लास उपलब्ध करण्यात आला आहे.

याप्रसंगी इनरव्हील अध्यक्ष वसुधा गुजराथी, माजी नगराध्यक्ष उषा ताई शिंदे, सचिव जयश्री शहा, विजया पाटील, शीतल उदावंत आदी उपस्थित होत्या. उषाताई शिंदे यांच्यातर्फे या तीनही मशीन प्रायोजित केल्या गेल्या.

दंतचिकित्सा कॅम्प: इनरव्हील क्लबच्या वतीने लहान मुलांसाठी जनता विद्यालयांमध्ये दंतचिकित्सा कॅम्प आयोजित केला होता. डॉ. गीतांजली अट्टल यांनी सुमारे ७० मुलांचे मुख आरोग्य तपासणी केली. त्यांनी मुलांना ब्रश कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. इनरव्हील क्लबतर्फे सर्वांना टुथपेस्ट व कार्टून ब्रश वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...