आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करून कांद्यास हमीभाव द्यावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शन करून निषेध आंदोलन करण्यात आले. गळ्यात कांद्याच्या माळा व हातात भगवे ध्वज घेऊन कांद्यास हमीभाव मिळालाच पाहिजे, नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे झालेच पाहिजे, जय भवानी, जय शिवाजी, उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिंदे फडणवीस सरकारचा धिक्कार असो, अशा विविध घोषणा देऊन शिवसैनिकांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.
यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख संभाजी राजे पवार, उपजिल्हाप्रमुख भास्करराव कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, किशोर सोनवणे, भागिनाथ थोरात, प्रवीण गायकवाड, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत शिंदे, गणेश पेंढारी, विठ्ठल महाले, युवासेना शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, गटप्रमुख अनंता आहेर, युवासेना उपतालुकाप्रमुख विकास गायकवाड, किरण ठाकरे, गणेश वडनेर, महेश सरोदे, भाऊराव कुदळ, प्रल्हाद बोरणारे, माजी सरपंच साहेबराव बोराडे, दशरथ देवकर, सुखदेव भोरकडे, नंदू पुणे, अर्जुन दाते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.