आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:येवल्यात चार ग्रामपंचायतींवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सात ग्रामपंचायतींवर शिवसेना ठाकरे गटाने चार भगवा फडकविला. कोटमगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षांचा पराभव झाला तर चांदगाव येथे ठाकरे सेनेचा प्रणव साळवे हा एकवीस वर्षांचा युवा सरपंच निवडून आला. आजच्या निकालाने अनेक प्रस्थापितांना धक्का दिला असून नवोदित चेहऱ्यांना ग्रामपंचायतीची सत्ता मिळवून दिली आहे.

शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांचे कट्टर समर्थक युवा नेते कांतीलाल साळवे व पंचायत समितीच्या माजी सभापती आशा साळवे यांचे पुतणे प्रणव साळवे यांनी चांदगाव ग्रामपंचायतीत एकतर्फी विजय मिळविला आहे. तर कांतीलाल साळवे यांचे चुलत बंधू सुनील साळवे यांनी नायगव्हाणच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्याने लगतच्या दोन्ही ग्रामपंचायत साळवे कुटुंबीयांच्या ताब्यात आल्या आहेत. कुसुरच्या सरपंचपदी संभाजी पवारांचे समर्थक माजी सभापती दिलीप मेंगाळ यांच्या गटाच्या सुरेखा गायकवाड यांची यापूर्वीच अविरोध झाली आहे. या तीनही ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची सत्ता आली. राष्ट्रवादीसाठी कोटमगाव बुद्रुक येथील निकाल धक्कादायक मानला जात आहे. येथे राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे यांचा तब्बल ५६० मतांनी पराभव झाला आहे. आडगाव चोथवा येथे रामकृष्ण खोकले यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.

चांदगावला सरपंचपदी प्रणव साळवे (४७२) विजयी झाले. तर सदस्यपदी छाया गोराणे, संगीता साळवे, प्रदीप अहिरे, रवींद्र गोराणे, सुनीता गोराणे हे विजयी झाले.नायगव्हाण येथे सरपंचपदी सुनील साळवे ४८७ मते घेऊन विजयी झाले. सदस्यपदी निलेश जोरवर, संतोष सदगीर, नितेश सदगीर, कोमल पानपाटील यांनी विजश्री खेचली.कुसूर येथे सुरेखा गायकवाड या सरपंचपदी अविरोध निवडल्या. तर सात जागा अविरोध झाल्या होत्या. निवडणूक झालेल्या जागेवर दीपक गायकवाड, लता गायकवाड यांनी विजय मिळविला आहे.

कोटमगाव बुद्रुक येथे अनवोदित चेहरा असलेले राजेंद्र काकळीज विरुद्ध राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे यांच्यात सरळ लढत झाली. मात्र तब्बल ६६७ मते घेऊन काकळीज यांनी कोटमे (१०६) यांचा मोठा पराभव केला. सदस्यपदासाठी शारदा बिलवरे, सविता वाघमोडे, सचिन ढमाले, मीना माळी, भागवत कोटमे, मंगला पाटील यांनी विजय मिळविला.आडगाव चोथवा येथे अटीतटीच्या लढतीत रामकृष्ण खोकले (८०८) यांनी शरद शिंदे (५७४) यांचा सरळ लढतीत पराभव करून सरपंचपद मिळविले. सदस्यपदी शिवाजी खोकले, मंगल घोडेराव, अर्चना खोकले, मेघा आहेर, सुनिता पवार, कचरू खोकले, दिलीप पवार, कांताबाई आहेर यांनी विजय मिळविला.

एरंडगाव खुर्दला आरती उराडे (३५२) व योगिता खापरे (३६८) यांच्यात अतिशय चुरशीचा सामना झाला. यात योगिता खापरे यांनी विजय मिळवला. येथे सदस्य पदी अतुल पडोळ, रेणुका पाटील, भास्कर पडोळ हे विजयी झाले तर इतर सहा जण अविरोध निवडले आहेत. नांदेसर येथे सुनीता जाधव (४२५) यांनी शीला वाघ (१८९) यांचा पराभव केला तर येथे सदस्यपदी लंका कापसे, हिना शेख, विलास मोरे, जायदा शेख, रेखा आहेर यांनी विजय मिळविला. आजच्या निकालानंतर भाजप राष्ट्रवादीसह शिवसेना ठाकरे गटाने विविध सरपंचपदावर दावे केले.

बातम्या आणखी आहेत...