आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक दिन:शहरात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाटोळे गल्लीत झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याला उत्सव समितीचे प्रमुख युवराज पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रमुख कार्यकर्ते आनंद शिंदे, दत्ता महाले व सैद यांनी पूजन केले. सन १२९४ पासून अल्लाउद्दीन खिलजीच्या सुरू झालेल्या सुलतानशाहीपासून थेट साडेतीनशे वर्षे परकीयांची सत्ता हिंदुस्तानवर होती. या काळात अन्याय अत्याचाराने परिसीमा गाठली होती.

कोणताही अधिकार सर्वसामान्यांना उरला नव्हता. त्यानंतर पराक्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शिवरायांनी ६ जून १६७४ हा हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक केला आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य सुरू झाले, म्हणून राज्याभिषेक दिनाला अनन्य साधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन सुभाष पहिलवान पाटोळे यांनी केले. यावेळी किशोर सोनवणे, धीरजसिंग परदेशी, मयूर कायस्थ, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अनिल हलवाई, साहेबराव सैद, अमित पटणी, चंपालाल उपासे, विजय पाटोळे, सोमनाथ नागपुरे, हरी नागपुरे, सुरेश गवते, सचिन माळोकर, गणेश राऊत, शुभम गवते, कुलदीप पाटोळे, विवेक चव्हाण, आदित्य नाईक, रोहित बोळे, बंटी धसे, गणेश पाटोळे, संतोष नागपुरे, सुधाकर पाटोळे, संजय सोमासे, प्रवीण गवते, संग्राम पाटोळे, सुभाष साळवे, उत्तम घुले यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...