आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लखमापूर सोसायटी अध्यक्षपदी शिवाजी धामणे ; उपाध्यक्षपदी शोभा बच्छाव यांची अविरोध निवड

लखमापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी शिवाजी काशीराम धामणे तर उपसभापतिपदासाठी शोभा रमेश बच्छाव यांची अविरोध निवड झाली. नुकतीच सोसायटीची निवडणूक पार पडली. त्यानंतर गुरुवारी (दि. १०) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सोसायटीच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके व चंद्रकांत अहिरे यांनी निवडणूक अविरोध झाल्याचे घोषित केले. त्यांना सचिव अनिल बहिरम यांनी सहाय्य केले. यावेळी नवनिर्वाचित संचालक नानाजी नामदेव दळवी, संजय पंडित देवरे, सुमनबाई मुरलीधर सोनारे, अशोक काळू दळवी, नामदेव विठोबा ह्याळीज, उत्तम वामन अहिरे, जिभाऊ बारकू देवरे, सुनील काळू मुसळे, संपत सावळीराम कांदळकर, अरुण सखाराम दळवी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी गावातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा दिलीप दळवी, संजय भामरे, ताराचंद देवरे, अशोक पाटील, डॉ. मधुकर आहिरे, धनराज हांडे, सुनील दळवी, मोठाभाऊ बच्छाव यांच्यासह ग्रामस्थांनी सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...