आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिवरायांचे विचार युवकांनी आचरणात आणावे; द्याने येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे प्रतिपादन

नामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले. द्याने येथे श्रीराम पंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपसरपंच कारभारी कापडणीस, सदस्य मोठा भाऊ कापडणीस यांच्या हस्ते गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनील कापडणीस यांनी केले. मोबाइल व पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जात असून तरुण पिढी भरकटत चालली आहे. शहरी भागात माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. ग्रामीण भागात माणसातील माणूसपण अजूनही जिवंत असल्याचे सांगितले.

आपल्या पाल्यांना छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करा. शिवचरित्र वाचण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली असून मोबाइलच्या अतिवापरामुळे हिंसक बनत चालली आहे. हिंदू संस्कृती वाचविण्यासाठी प्रेरित करा. आई-वडिलांची सेवा हिच ईश्वर सेवा असून तरुण शेतकऱ्यांनी शेतीत नवीन प्रयोग व तंत्रज्ञान विकसित करून भरघोस उत्पादन घेण्यासाठी तत्परता दाखवावी, असे नमूद करीत मुलांच्या मनावर शिवरायांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करा,असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...