आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्रमदान, मंदिर परिसरात औषधी वनस्पतींची लागवड; पाच महिन्यांपासून प्रत्येक शनिवार व रविवारी संवर्धन समितीचे 2 तास

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या ढग्या डोंगरावरील पुरातन खंडेराव महाराज मंदिर विकासासह पाण्याच्या कुंडांना गतवैभव प्राप्त करून दिले जात आहे. त्याचबरोबर देशी झाडांची लागवड करून पर्यटनस्थळ निर्मितीसाठी नागरिकांचे हात सरसावले आहेत. ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या माध्यमातून श्रमदानाद्वारे पर्यटन केंद्र विकसित केले जात आहे.

समितीचे प्रमुख जुगल लोया, सुरेंद्र क्षत्रिय, दत्ता जोशी, शरद भन्साळी, संतोष शिंदे, अमोल चव्हाण, शांताराम नवले, नितीन कट्यारे, पल्लवी चव्हाणके, शबाना शेख, संजय पाटील, नितीन वराडे, रामदास नवले, खालकर, खलील शेख आदींसह नागरिक सहभाग नोंदवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...