आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ; दोडी महाविद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोडी येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ‘ओन्ली फॉर अर्थ’ या संकल्पनेवर आधारित पोस्टर तयार करून पर्यावरण जाणीव जागृतीचा संदेश दिला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एस. बी. भाबड यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे अनावरण केले. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात पर्यावरणाचे चक्र बिघडले आहे.

मानवास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणं ही काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन प्रा. एस. बी. भाबड यांनी केले. प्रा. कासार बाबासाहेब यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. आर. ए. केदार, प्रा. एस. के. बलक, प्रा. ए. एम. आव्हाड, प्रा. एन. बी. वाकचौरे, प्रा. एस. एस. आव्हाड, प्रा. के. के. घुगे, प्रा. व्ही. आर. कांगणे आदी उपस्थित होते. डॉ. निलोफर शेख यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत उगले यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...