आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक:श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने देशभरात ; मालेगावी सात नद्यांचे जल व पर्वतांच्या मातीने शिवमूर्तीचा अभिषेक

मालेगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी शिवतीर्थावर शिवमूर्तीचा अभिषेक करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने देशभरातील सात प्रमुख नद्यांचे जल व सप्त पर्वतांच्या मातीने अभिषेक घालून छत्रपतींच्या महान कार्याचा गौरव केला.शिवराज्यभिषेक दिनानिमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले होते. १२ जून रोजी छत्रपती शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. या शिवराज्याभिषेक दिनास ३४९ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व विविध हिंदूत्ववादी संघटनांनी अभिषेक केला.

गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, सिंधू, कावेरी या नद्यांचे जल व हिमालय, सह्याद्री, कैलास, गब्बार, मेरू, हिंदुकुश व मंदाराचल या पर्वतांच्या मातीने दूध, दही, मध व फुलांनी मंत्रोच्चारात शिवमूर्तीला अभिषेक घालण्यात आला. सकाळपासून शिवप्रेमी नागरिकांनी शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी केली होती. पुतळा परिसरात आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...