आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामर्यादापुरुषोत्तम सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, श्रीराम जय राम जय जय राम, असा जल्लोष... पुष्पवृष्टी, भजन, कीर्तन अशा अभूतपूर्व उत्साहात शहरात श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा झाला शहरातील श्रीराम मंदिरासह सर्वत्र मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांनी दुपारी १२ वाजता जन्मोत्सवासाठी मोठी गर्दी केली होती. आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरापासून सायंकाळी पारंपरिक पद्धतीने ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे श्रीराम रथयात्रा काढण्यात आली. सजविलेल्या रथामध्ये श्री रामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सनी फसाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रीराम रथ यात्रेला प्रारंभ झाला. प्रभू रामांची सतरा फुटी भव्य धनुर्धारी मूर्ती आणि अयोध्या येथील प्रस्तावित श्रीराम जन्मभूमी स्थळावरील श्रीरामांच्या मंदिराची भव्य प्रतिकृती हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य होते. मंदिराच्या प्रतिकृतीत एलईडी लाइट बसविण्यात आले होते. शहराच्या विविध मार्गाने जाऊन आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात रथयात्रेचा समारोप व महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सनी फासाटे, ओम मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन पांडे, संतोष बळीद, नानाभाऊ शिंदे, किशोर पाटोदकर, दिनेश केकाण, कैलास भाबड, रमाकांत मंत्री, प्रदीप गुजराथी, आनंद काकडे, जयकुमार फुलवाणी, प्रमोद मुळे, संदीप नरवडे, राजाभाऊ पवार, कृष्णा शिंपी, माजी आमदार राजाभाऊ देशमुख आदींसह विविध राजकीय पक्ष संघटनाचे कार्यकर्ते आणि श्रीराम भक्त नागरिक मोठ्या संख्येने रथयात्रेत सहभागी झाले होते.
सकाळी आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे अभिषेक पूजा करण्यात झाली त्यानंतर भजनांचा कार्यक्रम होऊन दुपारी बारा वाजता या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यासह श्री बालाजी मंदिर, बालाजी विठ्ठल मंदिर, श्री मुरलीधर मंदिर, श्री स्वामी समर्थ, संत गजानन महाराज, श्री गुरुदेव दत्त मंदिर रेल्वे स्टेशन समोरील श्री राम कृष्ण मंदिर मंदिरात रामजन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.