आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याने हल्ला करत जखमी केले:शिवडीत बिबट्यांचे दर्शन; नागरिकांत दहशत, पिंजरा लावण्याची मागणी

उगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड तालुक्यातील सोनेवाडी, शिवडी, उगाव भागात महिन्यापासून बिबट्याचे दर्शन हाेत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. रविवारी निफाड-उगाव रोडवर एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले होते.

ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शिवडी, माळवाडी, सोनेवाडी भागात बिबट्याच्या जोडीने अर्धा तास द्राक्षबागेतच ठाण मांडले होते. नागरिकांनी वाहनांच्या लाइटच्या प्रकाशात बिबट्याचा शाेध घेतला. मात्र, ताे पळून गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या बंदाेबस्तासाठी पिंजरा लावण्याची मागणी संजय शिंदे, अरुण क्षीरसागर, शिवडी सोसायटीचे अध्यक्ष संदीप क्षीरसागर, प्रमोद क्षीरसागर, अॅड. रामनाथ शिंदे, अशोक शिंदे, गोरख क्षीरसागर, दिलीप शिंदे आदींसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...