आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्वसन:सिन्नरला पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचा ठिय्या

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती नदीपात्रात बांधलेल्या नगरपालिकेच्या गाड्यांसह इतर अतिक्रमणेही काढावीत. पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी सिन्नर तालुका प्रहार संघटनेतर्फे नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोर्चा काढून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. प्रहार पक्ष दोन भागात विखुरला गेला आहे. मात्र, दोन्ही संघटनांनी पूरग्रस्तांसाठी आंदोलन केले.

तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात युवा अध्यक्ष संदीप लोंढे, अमित शिंदे, गोपाळ गायकर, सुनील महाराज, उत्तम लोंढे, संजय कदम यांच्यासह पूरग्रस्त भागातील नागरिक सहभागी झाले होते. जेवणावळी नको, पक्की घरे हवी यासह आजी-माजी आमदारांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास नेत्यांच्या गाड्या तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला‌. सरस्वती नदीपात्रातील झोपडपट्टीधारकांना योग्य ठिकाणी पक्की घरी बांधून देत त्यांचे पुनर्वसन करावे, मातंगवाडी, अपना गॅरेज, मोफतनगर, भरडवाडी, तांबेश्वरनगर, नारायण देव बाबा भागातील झोपडपट्टीतील रहिवाशांना म्हाडा, सिडको या तत्सम योजनेद्वारे पक्की घरे बांधून द्यावी, नदीतील कचरा साफ करावा, नदी सफाईकरण मोहिमेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. पूरग्रस्तांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाच्या वतीने त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी‌ केली.

प्रहार जनशक्तीचा मोर्चा
एकतानगर, देवी रोड, अपना गॅरेज, डुबेरेनाका, वावी वेस येथील नागरिकांना घरे व तत्काळ मदत मिळावी, पिण्याचे पाणी मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. न्याय न मिळाल्यास मुख्याधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा देण्यात आला. पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी नगर‌सेवक अशोक मोरे, विजय बर्डे, सहसंपर्कप्रमुख सुनील जगताप, अरुण पाचोरे, वैशाली अनवट, कांचन भालेराव, विलास खैरनार, पांडू आगळे, दत्तू बोडके आदींसह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...