आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात २२ वर्षांतील सर्वात जास्त १००३ मिमी पाऊस कोसळला. तर पाच वेळा ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने खरिपाच्या ४४ टक्के क्षेत्राला फटका बसण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. यंदाच्या पावसाने पूर, नुकसानीसह विविध मुद्द्यांवर इतिहास रचला आहे.
तालुक्यात यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. २२ जूनपासून सुरू झालेला पाऊस सातत्याने ऑक्टोबरअखेरपर्यंत कोसळत राहिला. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने ३०० हेक्टरहून अधिक शेतजमीन खरडून वाहून जाण्याची घटना घडली. सिन्नर, पांढुर्ली, डुबेरे महसूल मंडलांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. यंदा १००३ मिमी पाऊस पडल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे. या अगोदर २००६ मध्ये ९५१, २०२० मध्ये ९११, २००३ मध्ये ८११, २०११ मध्ये ८०४ मिमी पाऊस पडला आहे. २२ वर्षांतील हे सर्वाधिक पाच पावसाळे आहेत. गतवर्षी अवघा ४३४ मिमी पाऊस पडला होता. तुलनेने यंदा दुपटीपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे.
२७ हजार हेक्टरवर नुकसान
यंदा ६२,३९६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. अतिवृष्टीने २७ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात नुकसान नोंदवले गेले आहे. त्यामुळे ४४ टक्के क्षेत्र बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोयाबीन, मका व भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला.
अतिवृष्टीमुळे मालमत्तांचे नुकसान
तालुक्यात सिन्नर, पांढुर्ली, डुबेरे, नांदूरशिंगोटे या महसूल मंडलांत ढगफुटीसदृश पाऊस कोसळण्याच्या घटना घडल्या. सिन्नर शहरात २ सप्टेंबरला १६५ मिमी पाऊस कोसळला. यात १९५ घरांचे नुकसान झाले. तर दोन जण वाहून गेले. अनेक दुकानांत पाणी घुसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.