आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:शालांत परीक्षा निकालात सिन्नर तालुका अव्वल; मनमाड केंद्रातील तीन शाळांचा निकाल 100 टक्के

मनमाड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड केंद्रातील श्री गुरूगोबिंद हायस्कुल, संत बार्णबा विद्यालय, सरस्वती विद्यालय या शाळांचा निकाल १०० टक्के लागला. कवी रवींद्रनाथ टागोर विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत नरेंद्र जोशी हा ९७.६० टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आला. छत्रे विद्यालय ९५.३२ टक्के, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय ९७.५० टक्के, केआरटी विद्यालय ९७.६० टक्के, सेंट झेवियर विद्यालय ९३.५८ टक्के, एच.ए.के. हायस्कूल ९८.६४ टक्के निकाल लागला.

गुरूगाेबिंद सिंग हायस्कूल : श्री गुरूगोबिंद सिंग हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. श्रद्धा राजेश चौधरी ९४ टक्के प्रथम, भूमिका सतिश खरे ९१.२० टक्के द्वितीय तर सिलवीया अनिल राठोड ९० टक्के तृतिय क्रमांक मिळविला.
छत्रे विद्यालय : छत्रे विद्यालयाचा निकाल ९५.३२ टक्के लागला. समृध्दी रविराज पाटील प्रथम ९६.८० टक्के (४७७), द्वितीय रितांशी गंगेले ९६.८० टक्के (४७५), तृतीय शेजल अनिल शिनकर ९६.२० टक्के (४७८) चतुर्थ खान आयेशा इरफान ९२.८० टक्के (४५३) तर प्राची किरण आव्हाड ९१.४० टक्के (४५२) गुण हे गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले.

टागाेर विद्यालय : कवी रवींद्रनाथ टागोर शाळेचा निकाल १०० टक्के लागला. ११८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्रावीण्य ८३ तर प्रथम श्रेणीत २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वेदांत नरेंद्र जोशी शाळेत व केंद्रात प्रथम ९७.६० टक्के, हर्षद देवीदास चौधरी द्वितीय ९३.४० टक्के, गौरी विजय पाटील आणि भंडारी सुविधी मनीष ९२.८० टक्के तृतीय, प्राप्ती प्रल्हाद गिते ९१.४० टक्के, रिया सुरेंद्र लहामगे, श्रृती श्रीकांत कुदाळ,९१.२० टक्के गुणानुक्रमे पहिल्या पाच क्रमाने उत्तीर्ण झाले.

सरस्वती विद्यालय : सरस्वती विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. सर्व २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मोक्षिका अमोल संसारे ८६.८० टक्के प्रथम, आकांक्षा अजय घोडके संत बार्णबा माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. सर्व ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १३ विद्यार्थी उच्च प्रावीण्य, प्रथम श्रेणीत ३०, द्वितीय श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम आदित्य अशोक गरूड ८४.६०, द्वितीय पुर्वा शशिकांत खाचणे ८३.२०, तर तृतीय क्रमांक अंजली प्राक्षिक पठारे ८१.६० टक्के हे गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले.

सेंट झेवियर हायस्कूल : सेंट झेवियर हायस्कुलचा ९३.५८ टक्के लागला. स्नेहल सचिन शेल्टे प्रथम ९३.६० टक्के, द्वितीय वृषाली जनार्दन वाघमारे ९३.४०, तृत्तीय श्रीराज आनंद तुरकणे ९२.४० टक्के, चतुर्थ किरण वाल्मीक गुमनर ८७.६० तर प्रांजली मनीष आहिरे पाचवा क्रमांक ८५.८० टक्के हे गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले.

मध्य रेल्वे विद्यालय : मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.५० टक्के इतका लागला. १४० पैकी १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्याम संतोष हिस्सळ ९१ टक्के, द्वितीय स्वरूप प्रमोद परांडे ८८.८९ टक्के तर ऋषिकेश संतोष गवळे ८८.४० टक्के, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

एचएके हायस्कल : एच.ए.के. हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा निकाल ९८.६४ टक्के लागला. विशेष श्रेणीत १००विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३७, तर ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर उर्दू माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला.

उर्दू माध्यम विद्यालय : उर्दू माध्यमात प्रथम शेख गौसीया कमोरोद्दीन ९०.२०, शेख मिश्कात अशाक ९० टक्के चौधरी मुस्कान तजमम्मूल ९० द्वितीय क्रमांक तर खान मसिरा उस्मान ८८.२० टक्के हे गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमाचा निकाल ९८.६४ टक्के लागला. ९८ पैकी ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संजना बबन वाघ प्रथम ८९.२० टक्के, द्वितीय पटेल मोहम्मद कैफ सलीम ८८.८० टक्के, शहा मुस्कान गुलामनबी ८८.८० द्वितीय तर शहा अक्सा खालीद ६० टक्के गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले.

बातम्या आणखी आहेत...